*कोकण Express*
*राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत चा अध्यादेश नियोजन विभागाचे उपसचिव महाराष्ट्र शासन नितीन भा.खेडकर यांनी निर्गमित येत आहे. राज्यात महायुती सरकार असून श्री. प्रफुल्ल सुद्रिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार निकटवर्ती असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष आहेत.
प्रफुल्ल सुरेश सुद्रीक यांनी सिंधू रत्न समिती रत्नागिरी सिंधुदुर्ग सदस्य पदी तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी 1 वर्षे कामकाज केले होते. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात रखडलेल्या विकासकामांना चालना दिली असुन,
जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी प्रफुल्ल सुद्रीक यांची वर्णी लागली असल्याने राष्ट्रवादी युवा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष वातावरण पहायला मिळत आहे.