सिरमची कोरोना लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही

सिरमची कोरोना लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही

*सिरमची कोरोना लस सुरक्षितलस उत्पादनाला फटका नाही*

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

*मुख्यमंत्र्यांकडून सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीच्या ठिकाणाची पाहणी

*आग प्रकरणाच्या चौकशी अहवालानंतर कारण स्पष्ट होईल*

*पुणे, दि. 22 :*

सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला कोणताही फटका बसलेला नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईलअसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

            सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या टिमशी त्यांनी संवाद साधला.

            विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेकामगार मंत्री दिलीप वळसे-पाटीलपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेखासदार गिरीश बापटआमदार चेतन तुपे, सिरमचे अदर पुनावालाविभागीय आयुक्त सौरभ रावपोलिस आयुक्त अमिताभ गुप्तामुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहताआरोग्य सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकरपुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमारजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुखजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेसंपूर्ण जगात कोविडचे संकट अद्यापही संपलेले नाहीगेल्या आठवड्यात सिरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. लस बनविणाऱ्या केंद्रात आग लागली ही बातमी आली. दुदैवाने या दुर्घटनेत पाच कामगार मृत्यूमुखी पडले. लस बनवली जाते ते केंद्र साठा संपूर्णपणे सुरक्षित आहे. आगीचे वृत्त समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती घेतली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात आहेतवरील दोन मजले जिथे नवे केंद्र सुरू केले जाणार होतेत्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. मात्र कोविडची लस जिथे बनवली जातेते केंद्र अंतरावर आहेसिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला कोणताही फटका बसलेला नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होवून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत्यू झालेल्या कुटुंबाची जबाबदारी सिरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय काही आवश्यकता असेल तर शासन ती मदत निश्चित करेलअसे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            सिरमचे अदर पुनावाला म्हणालेकोरोना लसीच्या पुरवठयावर कोणताही परिणाम नाही. बीसीजी आणि इतर लसीचे नुकसान झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत असून लसीवर परिणाम नाहीमात्र आर्थिक नुकसान मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!