*कोकण Express*
*राज्यात शाळा बंद बार सुरू अशी एक जरी शाळा बंद केली तर पुराव्यासहित सिद्ध करा…..*
*मंत्री दिपक केसरकर घरची संपत्ती विकून राजकारण करतो हे खोक्याचा आरोप करणान्यांनी लक्षात ठेवावे..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
राज्यात शाळा बंद बार सुरू अशी टिका करणान्यांनी एक जरी शाळा बंद केली असे पुराव्यासहित सिद्ध करा मी पदावर एक क्षण ही थांबणार नाही असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेवर दिले आहे. घरची संपत्ती विकून राजकारण करतो हे खोक्याचा आरोप करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे अन्यथा मी तोड उघडले तर काय होईल लक्षात ठेवा असा इशारा ही मंत्री केसरकर यांनी दिला आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने शुक्रवारी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री केसरकर म्हणाले. मला शिक्षण विभागाचे बरेच काम आहे त्यामुळे मी खासदार संजय राऊत व सुषमा आधारे याच्यावर टिका करत नाही. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर केलेली टिका निरर्थक आहे. मतदार संघातील जनतेची दिशाभूल करीत आहेत. पण जनता सुज्ञ आहे.