*कोकण Express*
*राज्यस्तरीय विद्यार्थी परिचर्या परिषदेत बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाचे नेत्र दीपक यश.*
विद्यार्थी परिचर्या संघटना ही राज्यस्तरावर कार्यरत असलेली परिचर्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारी एक संघटना आहे ,आणि या संघटनेमार्फत दर दोन वर्षांनी राज्यभरातील सर्व नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यात 100 मीटर धावणे, 400 मीटर रिले ,थाळीफेक, भालाफेक, बॅडमिंटन ,तसेच नृत्य स्पर्धा, एकपात्री अभिनय, प्रश्नमंजुषा, निबंध लेखन ,वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी ,भित्तिपत्रिका प्रदर्शन, चित्रकला, रेखाचित्र ,सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीची ही परिषद नाशिक येथे भरवण्यात आली होती. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून साधारणतः 871 विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या नर्सिंगच्या विविध शाखेमधून एकूण त१३विद्यार्थी- विद्यार्थिनी या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते .
यामध्ये बी.एस.सी नर्सिंग द्वितीय वर्षांमधून कुमारी सेजल शिवराम देसाई ही राज्यस्तरीय रेखाचित्र स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली व हिची निवड डिसेंबर 2023 मध्ये हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी झाली आहे .तेथे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे ती प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच थाळीफेक स्पर्धेमध्ये द्वितीय वर्ष जी. एन. एम .मधील कुमार शांताराम सत्यवान परब याने द्वितीय क्रमांक पटकावला तर द्वितीय वर्ष जी. एन.एम. मधीलच कुमार नितेश गंगाराम चव्हाण यांनी भालाफेक या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या या नेत्र दीपक यशामुळे बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाचा यशाचा आलेख उंचावला आहे .या त्यांच्या यशाबद्दल सर्व यशस्वी आणि सहभागी विद्यार्थी -विद्यार्थ्यांचे संस्था व महाविद्यालय स्तरावर कौतुक होत आहे. संस्था अध्यक्ष माननीय श्री. उमेश गाळवणकर व नर्सिंग प्राचार्या सौ.कल्पना भंडारी, प्राध्यापक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.