*कोकण Express*
*डॉ. काकासाहेब वराडकर यांचे कार्य दीपस्तंभ प्रमाणे : श्री अजय राज वराडकर*
डॉ. काकासाहेब वराडकर म्हणजेच डॉक्टर विठ्ठल कान्होजी वराडकर यांचे कार्य एखाद्या दीपस्तंभ प्रमाणे प्रेरणादायी असून सामाजिक बांधिलकीतून त्यांनी केलेले कार्य हे कट्टा दश क्रोशी बरोबरच आमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेची प्रेरणा देत असून अशी सकारात्मक ऊर्जा आम्ही बाळगून आहोत म्हणूनच आज कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यामध्ये आजी- माजी संस्था पदाधिकारी, सभासद, आजी-माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक, दाते, शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी संस्था व शाळेविषयी वैचारिक नाते ठेवणारे लेखक, कलावंत यांचे ही योगदान महत्त्वाचे आहे. आपल्या शाळेला येत्या काही वर्षात 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. यामध्ये काकासाहेबांनी 1926 ला सुरू केलेल्या शाळेचा वटवृक्ष झालेला असून आज जागतिक स्तरावर शाळेचा संस्थेचा सन्मान विद्यार्थी वाढवीत आहेत. शाळेच्या सर्व विषयाच्या बरोबर कला, क्रीडा प्रकारात विद्यार्थी यशस्वी होताना दिसत आहेत या मध्ये सर्वांचे कष्ट महत्वाचे आहेत असे उद्गार काढत असताना वराडकर इंग्लिश मीडियम स्कुल, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा या विनाअनुदानित चालणाऱ्या शाखा तसेच वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा या तिन्ही शाखेच्या सर्व शिक्षक- शिक्षिका ,शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी काका साहेबांचा हा आदर्श पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे निमित्ताने संस्था सचिव श्रीमती विजयश्री देसाई यांनी संस्था व शाळेच्या प्रगती विषयीची माहिती देताना सामाजिक बांधिलकीतून चालणारी एकमेव शाळा व काकासाहेब यांचे कार्य याबद्दल माहिती दिली. यावेळी विद्यार्थी अवधूत आचरेकर, कृतिका लोहार, समीर पालव, दर्श वराडकर यांनी डॉ. काकासाहेब यांच्या वरील विचार मांडले. कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी डॉ. काकासाहेब वराडकर यांच्यावरील नाटिका प्रदर्शित करण्यात आली यामधून डॉ.काका साहेबांचा जीवनपट दाखविण्यात आला. यावेळी इंग्रजी विभागामार्फत घेण्यात आलेल्या डॉ. शिवानंद इंग्रजी स्पर्धेचा निकाल जाहीर करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच तालुकास्तरीय क्रीडा प्रकारात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना श्री गणेश वाईरकर व खो -खो प्रशिक्षक बंडू सावंत यांनी देणगी स्वरूपात यशस्वी खेळाडूंना टी शर्ट दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजय राज वराडकर ,सचिव श्रीमती विजयश्री देसाई ,श्री सुनीलजी नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर माजी सचिव विजय वाईरकर , वराडकर इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, डॉ. दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा चे प्राचार्य श्री मिराशी सर, उपप्राचार्य श्री गावडे सर तिन्ही विभागाचे सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक,हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमा चे प्रास्ताविक वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सं)चे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन तृतीय वर्ष वाणिज्य विद्यार्थिनी वैभवी लाड यांनी केले. कार्यक्रम शालेय संसदेमार्फत करण्यात आला यासाठी संसद उपधिपती श्री किसन हडलगेकर व सहाय्यक भूषण गावडे यांनी काम पाहिले.
आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ देवयानी धनंजय गावडे यांनी आभार मानले.