आप्पांनी लावलेला वटवृक्ष सदा बहरत रहावा : राजेश जाधव

आप्पांनी लावलेला वटवृक्ष सदा बहरत रहावा : राजेश जाधव

*कोकण Express*

*आप्पांनी लावलेला वटवृक्ष सदा बहरत रहावा : राजेश जाधव*

*तळेरे हायस्कूलमध्ये प्रशालेचे संस्थापक वामनराव महाडिक (आप्पा) यांचा स्मृतिदिन साजरा*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

कोणत्याही प्रशालेची प्रसिद्धीही विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेवर अवलंबून असते,ही यशस्विता वाढत जावो आणि आप्पांनी लावलेला वटवृक्ष सदा बहरत जावो असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी कार्यक्रमात बोलताना केले.ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळरे येथे प्रशालेचे संस्थापक वामनराव महाडिक उर्फ आप्पा यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमानिमित्त बोलत होते.

यावेळी दीपप्रज्वलन व आप्पांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात झाली.याप्रसंगी तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, ग्रा. पं. सदस्य सचिन पिसे,नाद गावचे ग्रामस्थ तसेच आप्पांचे स्नेही गणपत गुरव,जमीन देणगीदार सुधीर ढेकणे,दत्तात्रय खटावकर, नरेश वरूणकर,प्रतिकेश तळेकर, कृष्णा खटावकर,अंकित घाडीे, हितेंद्र खटावकर,मोहन खानविलकर तसेच शाळा स. सदस्य शरद वायंगणकर,प्रवीण वरूणकर,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपत गुरव यांनी आप्पांच्या एकूणच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला तसेच त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आप्पांचे योगदान शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांनी कथन केले.प्रशालेतील प्रत्येक घटक आजी व माजी सर्वच विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या सहयोगाने आम्ही आमच्या शाळेचे नाव उज्वल करू असे प्राचार्य अविनाश मांजरेकर म्हणाले.आप्पांची सर्व राजकीय कारकीर्द व त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता यांचे कथन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही.काटे यांनी केले.
याप्रसंगी जमीन देणगीदारांचे गुलाब पुष्प देऊन आदरातिथ्य करण्यात आले. तसेच नुकत्याच झालेल्या विभाग स्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश संपादित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन कौतुक केले. तसेच विज्ञान नाटिकेचे उत्कृष्ट संहिता लेखन केल्याबद्दल विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका एस.यु.सुर्वे यांचे शाळा समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहा.शिक्षिका डी.सी. तळेकर तर आभार एस.यु.सुर्वे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!