कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सोयीसुविधांसह डॉक्टरांची कमतरता

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सोयीसुविधांसह डॉक्टरांची कमतरता

*कोकण Express*

*कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सोयीसुविधांसह डॉक्टरांची कमतरता*

*आरोग्य सेवेचे वाजले तीन तेरा ;सेवा न सुधारल्यास आंदोलन छेडण्याचा युथ कॉंग्रेसचे आतिश उर्फ भाई जेठे यांचा इशारा*

*कणकवली/ प्रतिनिधी*

कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात सोयीसुविधांसह डॉक्टरांची कमतरता आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. ही कोलमडलेली आरोग्य व्यवस्था जिल्हा शल्यचिकित्सक केव्हा सुधारणार हे त्यांनी स्पष्ट करावे, तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युथ कॉंग्रेसचे माजी कार्याध्यक्ष आतिश उर्फ भाई जेठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

उपजिल्हा रुग्णालयात सोयीसुविधांच्या वाणवेसह डॉक्टरांची कमतरता आहे. याशिवाय कर्मचारी देखील कमी आहे. याचा फटका उपचार घेणाऱ्या रुग्णांचा बसत आहे. कणकवली तालुक्यात सध्या डेंगूसह अन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या साथीच्या रोगाची लागण झालेले रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल होता. मात्र, योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी डॉक्टरचे अवाजवी दर असल्यामुळे त्यांच्या व्यक्तीच्या खिशांना परवडत नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा वेळीच सुरळीत न झाल्यास काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा श्री. जेठे यांनी दिला आहे. आरोग्य यंत्रणेबाबत जनतेची तक्रार असल्यास (७२१८६ ०६०६०) या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!