वाहतुकीस अडथळा ठरणारी ‘ती’ बांधकामे न.पं.ने हटवली

वाहतुकीस अडथळा ठरणारी ‘ती’ बांधकामे न.पं.ने हटवली

*कोकण Express*

*वाहतुकीस अडथळा ठरणारी ‘ती’ बांधकामे न.पं.ने हटवली…!*

*तेली आळी – हर्णे आळी वळणावरील रस्त्याचा रुंदीकरणाचा मार्ग झाला मोकळा…!*

*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा पाठपुरावा…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शहरातील तेली हर्णेआळी मार्गे नगरपंचायतीकडे जाणाऱ्या रोडवरील हर्णे आळीच्या प्रवेशद्वारालगत अरूंद वळणालगत असलेल्या जागेतील बांधकामे वाहतुकीस अडथळा ठरत होती. ती नगरपंचायत प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने बुवारी सकाळी हटविली. त्यामुळे या रस्त्याचा रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हर्णेआळी प्रवेशद्वारालगत अरुंद वळणालगत श्री.माणगावकर व श्री तिरवडेकर यांची जागा होती. त्यांना जागेचा मोबादला न.पं.ने देऊन ती जमीन ताब्यात घेतली आहे. त्या जागेत दोन घरे व एक स्टॉल होता. ही बांधकामे वाहतूकीस अडथळा निर्माण करणारी व अपघातांना कारणीभूत ठरत होती. या रस्त्याच्या रुंदीकरण व वाहतूकिस अडथळा ठरणारी ही बांधकामे हटविण्याबाबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार न. वीपं. मार्फत संपादनाची प्रक्रिया राबवून हा रस्ता ९ मीटर करण्याबाबत निर्णय घेतला होता. बुवारी सकाळी नगरपंचायत प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने ही बांधकाम हटविण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,यांच्यासह न.पं.चे कर्मचारी सुमित कुबल, वैभव करंदीकर, सचिन नेरकर, मिथून ठाणेकर, गजानन उपरकर, सोनू भंडारी आदी उपस्थित होते. त्या कॉर्नरवरील घरे व स्टॉल हटविल्यानंतर त्या भागाचे सपाटीकरण करून अरुंद असलेला रोड रुंद केला जाणार आहे. त्यानंतर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा शब्द श्री. नालवडे व बंडू हर्णे यांनी ग्रामस्थांना दिला होता, तो पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!