*कोकण Express*
*अमृत कलश यात्रेच्या निमित्ताने तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने तळेरे गावातील मातीची भव्य रॅली काढून अमृत कलश पं.स.मध्ये सुपूर्द*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
आझादीच्या अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी माटी मेरा देश” अमृत कलश यात्रेच्या निमित्ताने तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने तळेरे गावातील माती भव्य रॅली काढून कणकवली पंचायत समितीमध्ये कलश सुपूर्द करण्यात आला.
दिल्ली येथे या मातीचा वापर शूरवीराच्या स्मरणार्थ अमृतवाटीकेची निर्मिती केली जाणार आहे.याप्रसंगी तळेरे बसस्थानकासमोर वाजत गाजत रॅली काढून कलश पुजन करण्यात आले.त्यानंतर ते कलश कणकवली पंचायत समिती मध्ये घेऊन जाऊन सुपूर्द करण्यात आले.सदर कार्यक्रमामध्ये तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,माजी सभापती दिलीप तळेकर,उपसरपंच शैलेश सुर्वे,ग्रामपंचायत सदस्य संदिप घाडी,सचिन पिसे,सौ.रिया चव्हाण,सौ.सुप्रिया तळेकर,ग्रामसेविका सौ.राजलक्ष्मी जाधव,माजी उपसरपंच दिनेश मुद्रस,सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव,निलेश तळेकर,चिन्मय तळेकर,ग्रा.प.कर्मचारी संतोष मेस्त्री,प्रशांत वरवडेकर,वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.