*कोकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा माजी विद्यार्थी नागराज चौगुले याची मुंबई पोलिस दलात निवड*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
विद्यामंदिर प्रशालेचा सन २०१६ च्या दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थी नागराज चौगुले या हरहुन्नरी मुलांने मोठ्या जिद्दीने आपल्या गरीब परिस्थिवर मात करून मुंबई पोलीस दलात भरती होऊन निवड झाली . नागराज हा इयत्ता दुसरी पासून विद्यामंदिर शाळेत शिक्षण घेत होता सर्व खेळात अग्रेसर असलेला नागराज एन सी सी विभागात कार्यरत होता . त्यातील सर्व कौशल्य आत्मसाथ करून सी सर्टीफिकेट त्याला प्राप्त झाले ज्यूदो कराटे या खेळात त्याने प्राविण्य मिळवून ब्लॅक बेल्ट मिळवून यशाचे शिखर गाठले पंच म्हणून त्याची कामगिरी वाखाणण्या जोगी आहे. शांत आणि संयमी तसेच आदरयुक्तपणा त्यांने आपल्या अंगी प्राप्त करून पोलीस भरतीची परिक्षा उचांकी गुणांनी मिळवून पास झाला खेळ आण त्याची बुध्दीमता याच्या जोरावर नागराज यशाच्या शिखरापर्यंत पोहचला या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ . पी जे कांबळे सर आणि जेष्ठ शिक्षक वणवे सर ,एन सी सी विभाग प्रमुख अमोल शेळके सर यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी प्रशालेतील एन सी सी चे विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाच प्रास्ताविक शेळके सरांनी केले विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी स्वकष्टातून जीवनातील ध्येय कशा पद्धतीने गाठतात याचा आदर्श प्रशालेतील सर्व विद्यार्थांनी घ्यावा असे प्रतिपादन श्री वणवे सरांनी करून नागराजचे अभिनंदन केले . तसेच मुख्याध्यापक पी जे कांबळे सरांनी माजी विद्यार्थी नागराज व त्याचे वडील यांचेही अभिनंदन करून नागराजला शुभेच्छा दिल्या . आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली .