*कोकण Express*
*पाण्याच्या निच-याची योग्य सोय करावी*
बांदा कट्टा कॉर्नर येथे सध्या उड्डानपुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. बांदा वाफोली रस्त्याच्या बाजूला एक नाला असून पावसाळयात पाण्याचा निचरा याच नाल्यातून होत असतो. परंतू या नाल्यासाठी वापरण्यात आलेले पाईप खूपच लहान असल्याने एक दोन तास जरी मोठा पाऊस पडला तरी या नाल्यातून पाणी योग्य प्रमाणात जात नाही परीणामी पाणी रस्त्यावर येते व वाहतूक पूर्णपणे बंद होते शिवाय आजूबाजूच्या दुकानांचे सुध्दा नुकसान होते. सदर काम हे काही वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत करण्यात आले होते. आता राष्ट्रीय महामार्गाकडूनच याठिकाणी उड्डानपूलाचे काम सुरु आहे त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रशांत बांदेकर यांनी याठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी मोठे पाईप टाकण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाकडे केली आहे.