*कोकण Express*
*कासार्डे केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेत वैष्णवी सावंत प्रथम तर पल्लवी पाटील द्वितीय*
*तालुका स्तरिय पाककला स्पर्धेचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान कासार्डे नं. १.ने पटकावला*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
शासनाच्या वतीने सन 2023 वर्ष पूर्ण धान्य पोषक वर्ष म्हणून जाहीर केले असून ,महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा परिषद शाळा मधून पालकांमध्ये जनजागृती व्हावी सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा याकरिता शाळा स्तरावर व केंद्र स्तरावर तृणधान्य पाककला कृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी आपल्या मनोगत जिल्हा परिषद केंद्र शाळा कासार्डे नंबर १ येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेच्या वेळी आपल्या मनोगतात सांगितले.तसेच स्पर्धे विषयी असणारे नियम याची माहिती आपल्या प्रस्ताविकेमध्ये केन्द्रप्रमुख श्री संजय पवार यांनी सांगितले तृणधान्य याचे आहारातील महत्व विस्तार अधिकारी सौ प्रेरणा मांजरेकर यांनी समजावले. स्पर्धेमध्ये केंद्र शाळा कासार्डे १चे पालक सौ वैष्णवी विजय सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावत तालुकास्तरीय होणाऱ्या पाककला स्पर्धेचे कासार्डे केंद्र गटाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला, त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पल्लवी पाटील शाळा ओझरम नंबर १, तृतीय क्रमांक श्रद्धा धुरी शाळा ओझरम मापरवाडी यांनी पटकाविला.
कासार्डे केंद्रस्तरीय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धेचे आयोजन कासार्डे नंबर एक शाळेत करण्यात आले होते या स्पर्धेचे दीप प्रज्वलन व उद्घाटन आणि बक्षिस वितरण कणकवली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री किशोर गवस तळेरे प्रभागाच्या विस्ताराधिकारी सौ प्रेरणा मांजरेकर कासार्डे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संजय पवार कासार्डे गावचे उपसरपंच गणेशजी पाताड़े ओझरम गावचे उपसरपंच प्रशांत राणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुप्रसाद सावंत,उपाध्यक्ष प्रमोद शेट्ये,केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक पवार, कासार्डे विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन दीपक सावंत, युवा उद्योजक प्रणिल शेट्ये, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष संतोष सावंत, गावचे पोलिस पाटील महेंद्र देवरुखकर, ग्रामपंचायत सदस्या शारदा आंबेरकर, कृषी मंडळ अधिकारी आंबारडेकर,कृषी सहाय्यक श्री कावले,माजी मुख्याध्यापक शेट्ये गुरुजी, कासार्डे देऊलकरवाडी शाळा मुख्याध्यापक गोसावी सर ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद शेलार, शिक्षणप्रेमी विजय कदम,योगेश कदम उपशिक्षक भाई पाटील सर ,भरत पाताडे , योगेश कदम,तसेच पालक व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य जे परिक्षक लाभले होते ते म्हणजे प्राथमिक शिक्षक नितिन पाटील, कृषि सहाय्यक राहुल कोळवते, आरोग्य सेविका दर्शना धुरे अशा तीन प्रकारचे होते .या स्पर्धेला कासार्डे केंद्रातील एकूण १२ शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी महिलांना केंद शाळा कासार्डे नं १आकर्षक चषक व प्रमाणपत्र आणि कृषी विभागाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख संजय पवार आणि केंद् शाळा कासार्डे नंबर १ च्या शाळा व्यवस्थापन,माता पालक समिती यांनी विशेष मेहनत घेतली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार श्री जाकीर शेख सर यांनी मानले.