मनसेचे महामार्ग रस्त्याच्या समस्यांबाबतचे उद्याचे आंदोलन स्थगित ; परशुराम उपरकर

मनसेचे महामार्ग रस्त्याच्या समस्यांबाबतचे उद्याचे आंदोलन स्थगित ; परशुराम उपरकर

*कोकण Express*

*मनसेचे महामार्ग रस्त्याच्या समस्यांबाबतचे उद्याचे आंदोलन स्थगित ; परशुराम उपरकर*

*विविध मुद्दयावर तातडीने कारवाईचे करण्याचे महामार्ग प्राधिकरण उपअभियंता यांचे लेखी आश्वासन*

*प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राष्ट्रीय महामार्गाच्या अनेक त्रुटी आणि प्रलंबित कामासाठी ११ सप्टेंबर रोजी ओसरगाव येथे आंदोलन छेडण्याची भूमिका घेतली होती. मात्र महामार्ग अधीक्षक अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्या विनंतीनुसार दोन्ही उपअभियंता आणि आरटीओ अधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्दयावर तातडीने कारवाईचे करण्याचे महामार्ग प्राधिकरण उपअभियंता श्री. शिवानिवार नदकिशोर काळे यानी लेखी आश्वासन दिले, त्यामुळे मनसेचे महामार्गाच्या समस्यांबाबतचे उद्याचे आंदोलन स्थगित करत असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. परंतु प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि आरटीओ अधिकान्यासोबत झालेल्या बैठकीत स्पीड बाबत ८० किमीचे बोर्ड लावणे. हेल्पलाइन

इमर्जन्सी नंबर चे फलक महत्त्वाच्या ठिकाणी लावणे. तोडण्यात आलेले दुभाजक बंद करणे. राष्ट्रीय महामार्गावरील बोर्डाची स्वच्छता करणे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रस्त्याला पडलेले खड्डे तसेच वागदे येथील रस्त्याचे खड़े पावसाळी धनराज चा वापर करणे त्वरित भरण्यात यावेत. तुटलेल्या गटारीची दुरुस्ती करणे. रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करणे. रस्त्याच्या बाजूला असणारे गवत व झाडी काढणे. रात्रीच्या वेळी वाहनाना दिशा दर्शविणारे Cat Eyes बसवणे Road Safety Audit मध्ये दर्शविल्याप्रमाणे अंमलबजावणी करणे, कार्यालयात रोड शेप्टी इजांसी आहे त्यांना केलेल्या सूचना अपूर्ण आहेत पोलीस आणि आरटीओ यंत्रणेवर ताण असल्याने प्रमुख विषयावर चर्चा झाल्याचे श्री उपरकर यांनी सांगितले.

चाकरमानी लाजा पर्यंत खड्ड्यातून येणार आहेत. त्यामुळे पुढील रस्त्यावर स्पीड मर्यादा ८० किलोमिटर प्रती तास बोर्ड ४ दिवसांत लावण्याचे आश्वासन दिले आहे. हायवे वर झाडी व साईन बोर्ड साफसपाई करण्यात येणार आहे. मातीची कडा दिसण्यासाठी सफेत पट्टे • अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका व क्रेन पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. बोर्ड वर आरटीओ, पोलीस आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचे फोन नंबर लावण्यात येतील. हायवेवरून पाणी विसर्ग तातडीने होण्यासाठी होल साफ करण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य

हायवे वर मिडल कट बंद करण्यात येतील, तसेच ते मिडल कट काहीजण तोडतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे

परशुराम उपरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!