उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला.आपत्ती विषयक ज्ञान वाचवेल आपल्या सहित इतरांचे प्राण: भूषण पागधरे

उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला.आपत्ती विषयक ज्ञान वाचवेल आपल्या सहित इतरांचे प्राण: भूषण पागधरे

*कोकण Express*

*उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला.आपत्ती विषयक ज्ञान वाचवेल आपल्या सहित इतरांचे प्राण: भूषण पागधरे*

*कुडाळ येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नागरी संरक्षण दलातर्फे आपत्ती व्यवस्थापनाची कार्यशाळा संपन्न*

“आपत्तीमध्ये काय करावे याची प्राथमिक माहिती असेल तर आपत्ती मधून आपण आपल्या बरोबर इतरांचेही प्राण वाचवू शकतो. कारण उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला.”. असे उद्गार जिल्हा नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक नियंत्रक भूषण पागधरे यांनी काढले ते कुडाळ येथील बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेमध्ये विविध विभागातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये आग विझवताना व आगीत सापडलेल्यांना कशी मदत करावी? फायर सिलेंडर(अग्निशमन सिलेंडर -डिस्टिंग्युशर)कसा युज करावा ,जखमी रुग्णाला सुरक्षित स्थळी कसे हलवावे ,हलवताना दोरखंडाची गाठ कशी मारावी, पुरामध्ये सापडलेल्यानां कसे वाचवावे ? अपघातग्रस्त पुरुष व महिलांना कोणत्या पद्धतीने हाताळावे ? याची प्रात्यक्षिकासह ,पीपीटी द्वारे माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर बॅ नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य अरुण मर्गज , नर्सिंग महाविद्यालयाच्या कल्पना भंडारी वैशाली ओटवणेकर,सुमन करंगळे -सावंत,बी.एड महिला महाविद्यालयाचे प्र प्राचार्य परेश धावडे, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे,मधुरा इंन्सुलकर, बॅ नाथ पै फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ सौरभ धर, डॉ. प्रगती शेटकर,बॅ नाथ पै ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर, व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!