*कोकण Express*
*तोरसोळे फाटा येथे डंपर- चारचाकीचा भीषण अपघात*
*देवगड – तळेबाजार येथील आई-मुलगा जागीच ठार*
*कसाल येथे नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी जात असताना झाला अपघात*
देवगड / प्रतिनिधी
देवगड – नांदगाव महामार्गावर तोरसोळे फाटा येथे शनिवारी सकाळी ८.३० वा सुमारास चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरने चारचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तळेबाजार येथील आई व मुलगा जागीच ठार झाले. महेश मोहन तोरस्कर (४८) व श्रीमती मनीषा मोहन तोरस्कर (७८) दोन्ही रा. तळेबाजार बाजारपेठ अशी मृतांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तळेबाजार बाजारपेठ येथील महेश तोरस्कर हे आपल्या आईला घेऊन कसाल येथे नातेवाईकाचे निधन झाल्याने अंत्ययात्रेसाठी चारचाकीने जात होते. सकाळी ८.३० वा सुमारास तोरसोळे फाटा येथे नांदगावच्या दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला.