*कोकण Express*
*खारेपाटण मध्ये डोंगराचा काही भाग खचला*
*सरपंच प्राची ईस्वलकर घटनास्थळी दाखल होऊन महसूल विभागाला घटनेची दिली माहिती*
खारेपाटण तावडेवाडी या भागात डोंगर भागात असलेल्या घराच्या मागील डोंगराचा काही भाग खचत असल्याचा प्रकार आज समोर आला. घटनेची माहिती मिळतात खारेपाटण च्या सरपंच प्राची ईस्वलकर या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. याबाबत त्यांनी महसूल यंत्रणेला तात्काळ माहिती दिली असून, याबाबतची दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच प्राची ईस्वलकर यांनी दिली. खारेपाटण तावडेवाडी या भागामध्ये डोंगर भागात 5 घरे असून त्यामध्ये सुमारे 40 ते 45 लोकांची वस्ती आहे. या डोंगर भागात असलेल्या घरांच्या मागील भागातील डोंगराला काही प्रमाणात भेगा जात माती खाली जाली तसेच काहींच्या अंगणाचा भाग खचल्याचा प्रकार घडला असल्याची माहिती प्राची ईस्वलकर यांनी दिली.. सदर घरांचा भाग हा रस्त्याशी थेट जोडला जात नसून या घराजवळ जाण्याकरता वाटेत एक ओहळ पार करावा लागतो. त्यामुळे याबाबतची तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सरपंच ईस्वलकर यांनी केली आहे.