*कोकण Express*
*फोंडाघाट मार्गातून वाहतूक सुरू; कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी घटनास्थळी दाखल होऊन दरड हटवली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाने फोंडाघाट मध्ये आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर दरड कोसळली होती. पिडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी मंत्र्यांच्या दौन्यात व्यस्त असतानाही घटनास्थळ गाठून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली. साडे अकरा वाजता रस्त्यावर कोसळलेली दरड जेसीबी च्या सहाय्याने दुपारी 1 वाजता पूर्णपणे बाजूला हटवली आणि दुतर्फा वाहतूक सुरळीत केली,