*कोकण Express*
*मुंबई-गोवा महामार्गाच्या विविध समस्या बाबत चीफ इंजिनीयर विनय देशपांडे यांची माजी आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी संजना हळदिवे*
मुंबई गोवा महामार्गाच्या समस्याबाबत नॅशनल हायवे सेक्रेटरी आणि चीफ इंजिनियर विनय देशपांडे यांची माजी आमदार प्रमोद जठार यांनी बेलापूर येथे कोकण भवन येथे आज भेट घेतली. या भेटीत प्रमुख्याने खारेपाटण ब्रिज लवकर सूरु करण्यासंबंधी चर्चा केली. यावर खारेपाटण ब्रिजची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून हे ब्रिज लवकरच सुरू करण्यात येईल अशी ग्वाही देशपांडे यांनी प्रमोद जठार यांना दिली.
त्यासोबत मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर, चिपळूण, लांजा, राजापूर ते झाराप भागातील अनेक समस्या दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली प्रकल्पग्रस्ताना नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी अशी विनंती यावेळी प्रमोद जठार यांनीं केली २०२२ च्या आत मुंबई गोवा महामार्गाचे लोकार्पण व्हावे अशी विनंती जठार यांनीं केली. या सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन देशपांडे यांनी प्रमोद जठार यांना दिले.