भाजपा वेंगुर्ला च्या वतीने वेंगुर्ला हायस्कूल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून ” गुरुवंदना ” कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यातील दहा सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार संपन्न

भाजपा वेंगुर्ला च्या वतीने वेंगुर्ला हायस्कूल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून ” गुरुवंदना ” कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यातील दहा सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार संपन्न

*कोकण Express*

*भाजपा वेंगुर्ला च्या वतीने वेंगुर्ला हायस्कूल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून ” गुरुवंदना ” कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यातील दहा सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार संपन्न*

पाच सप्टेंबर हा शैक्षणिक विश्वातील एक महत्त्वाचा दिवस. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. हा दिवस आपल्या देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो कारण डॉक्टर राधाकृष्णन हे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक व तत्वज्ञ होते.

त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला . याच दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला च्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील दहा सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा विद्यार्थ्यांच्या समक्ष शाल भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन साहित्यिक शिक्षक अजित राऊळ व भाजप प्रदेश सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सर्वश्री रमण किनळेकर सर (आसोली हायस्कूल ) , शामराव काळे सर ( वेंगुर्ले हायस्कूल ) , जागृती वायंगणकर मॅडम ( चमणकर हायस्कूल आडेली ) , एम. जी.मातोंडकर सर ( अणसुर पाल हायस्कूल ) शिरोडकर सर ( अ.वि.बावडेकर – शिरोडा ) , वेंगुर्लेकर मॅडम ( आसोली हायस्कूल ) , वालावलकर मॅडम ( सातेरी हायस्कूल वेतोरे ) , कांबळी सर ( न्यु.इंग्लिश स्कुल उभादांडा ), आनंद सावंत सर ( अ.वि.बावडेकर – शिरोडा ) , अवधूत ऐनजी सर ( अ.वि.बावडेकर – शिरोडा ) इत्यादी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी सत्कार स्वीकारले व सत्कारास उत्तरही दिले.

वेंगुर्ला हायस्कूलचे 1967 चे माजी विद्यार्थी व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त शाखा व्यवस्थापक प्रकाश नांदोस्कर हे माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आवर्जून उपस्थित होते.

निवेदन सामंत सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक पी.डी. कांबळे सर यांनी मांनले.

भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांच्या कल्पक नियोजनास तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, सरपंच संघटना अध्यक्ष विष्णू तथा पप्पू परब, दिलीप परब, वसंत तांडेल , दादा केळुसकर , भुषण सारंग इत्यादी कार्यकर्त्यांची समर्थ साथ लाभली व कार्यक्रम यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!