*कोकण Express*
*वैभववाडी येथे एक महिनाभर मोफत रेडीमेड गारमेंट प्रशिक्षण*
*सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी होणार वैभववाडी नगरपंचायत येथे नोंदणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वैभववाडी येथे एक महिनाभर जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत रेडीमेड गारमेंट (फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण )सुरू करण्यात येणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण पुणे मोफत असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र व विद्यावेतन १००० रुपये देण्यात येणार आहे. तरी ज्या लाभार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरायचे असतील अशांनी सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता नगरपंचायत वैभववाडी येथे येताना आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला, फोटो २,नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला किंवा गॅजेट अथवा पॅन कार्ड घेऊन येणे आवश्यक आहे.अधिक माहिती साठी संपर्क 9096564410 येथे संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात येत आहे.