*कोकण Express*
*उमेद फाऊंडेशनच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी तळेरे येथे शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याचे आयोजन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
उमेद फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.यावर्षातील शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना उमेद फाऊंडेशन शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम सोमवार दि.४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता वामनराव महाडीक विद्यालय,तळेरेच्या डॉ.एम्.डी.देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला आहे.
उमेद फाऊंडेशनच्या वतीने आतापर्यंत २३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची मदत करण्यात आली आहे.तसेच फाऊंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत.त्याच सामाजिक बांधिलकीतून गरीब,गरजू,होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते.
या कार्यक्रमासाठी उमेद फाऊंडेशनचे प्रकाश गाताडे व कोल्हापूर टीम सदस्य- सागर पेंडूरकर,जाकीर शेख,नितीन पाटील तसेच वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर,कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे प्राध्यापक विनायक पाताडे,श्रावणी कंप्युटरचे संचालक सतीश मदभावे, ह्युमन राईट असोसिएशन संघटनेच्या कणकवली तालुका महिला संघटक व सामाजिक कार्यकर्त्या सौ.श्रावणी मदभावे,दळवी कॉलेज प्राध्यापक हेमंत महाडीक उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रम प्रसंगी जिल्ह्यातील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी,पालक,शिक्षक आणि उमेदीयन यांनी उपस्थित रहावे असे आवाहन उमेद फाऊंडेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समन्वयक नितीन पाटील व जाकीर शेख यांनी केले आहे.