*कोकण Express*
*राणेंना धक्का देणारा अजुन जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार: आम. नितेश राणे*
*सिंधुदुर्गातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व..*
*सिंधुदुर्ग:*
सिंधुदुर्गातील७० पैकी ५७ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या असून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेकडे यापूर्वी असलेल्या तोडवली-बावशी, कुपवड़े, चिंदर, चुनवरे, दांडेली, कोलगाव सेनेकड़ून हिसकावून घेतल्या आहेत. सिंधुदुर्गातील आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व पाहता येथील जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत असून शेतकऱ्यांच्या हिताच्या बिलांचे समर्थन जिल्ह्यातील जनता करत आहे हेही दाखवून दिले आहेत. तर आता पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा बँक यात देखील सत्ता देखील आमचीच असणार आहेत आणि विरोधक हद्दपार होणार आहेत ही काळ्यादगडावरची रेघ आहे. असे व्यक्तव्य करत आम. नितेश राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.