जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

*कोकण Express*

*जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन*

*मुंबई*

मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या दमदार अभिनयाने त्यानी रसिकांची मने जिंकून घेतली होती. त्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून सीमा देव या अल्झायमर या आजाराशी झुंज देत होत्या, त्यातच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

अभिनेत्री सीमा देव यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. १९७२ मध्ये रिलीज झालेल्या ‘आनंद’ चित्रपटातही त्यांनी काम केले होते. या चित्रपटात सीमा देव यांनी श्रीमती सुमन कुलकर्णी यांची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी ‘कोशिश’ आणि ‘सरस्वतीचंद्र’ यासारख्या चित्रपटामध्येही काम केले आहे. यंदा कर्तव्य आहे, ‘माझी आई’, ‘सुवासिनी’, ‘सोनियाची पावले’, ‘मोलकरीण’ यांसारख्या अनेक चित्रपटांत रमेश देव यांच्यासह भूमिका साकारल्या सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘या सुखानों या’ या चित्रपटातील सीमा यांच्या भूमिका गाजल्या. १९६३ सालच्या ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा यांना मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!