सह्याद्री बॅटरीचे मालक शामसुंदर उर्फ बापू मयें यांचे निधन

सह्याद्री बॅटरीचे मालक शामसुंदर उर्फ बापू मयें यांचे निधन

*कोकण Express*

*सह्याद्री बॅटरीचे मालक शामसुंदर उर्फ बापू मयें यांचे निधन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहरातील जुने बॅटरी व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असलेले सह्याद्री बॅटरी च्या दुकानाचे मालक शामसुंदर महादेव मर्य उर्फ बापू मर्ये (वय 65) यांचे फोंडाघाट येथे निधन झाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी कोल्हापूरमध्ये एका बॅटरी रिपेरिंग करणाऱ्या दुकानदाराकडे काम केले. तेथे बॅटरी व्यवसायातील कला आत्मसात करून कणकवलीत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्यांनी बॅटरी व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला एका छोट्या जागेवरून हा व्यवसाय सुरू करत असताना तत्कालीन परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ बांधकामे व्यवसायिक स्वर्गीय विजयराव नाईक यांनी त्यांना आपल्या इमारतीत गाळा दुकान व्यवसायाकरिता दिला. नाईक घराण्यचे त्यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. महामार्ग रुंदीकरणात त्यांचे दुकान है विस्थापित झाले. मनमिळाऊ व सर्वांशी स्नेहभाव बाळगणारी व्यक्ती म्हणून शामा मर्ये यांची ओळख होती. कणकवली शहर, देवगड, फोंडा घाट व तरळे येथे देखील त्यांची दुकाने आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, दोन सुना नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!