*कोकण Express*
*कणकवली पोलीस स्थानक परिसरात विविध प्रजातींची वृक्ष लागवड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली पोलिस स्थानक परिसरात पोलिसांनी विविध प्रजातींची वृक्ष लागवड केली. यामध्ये औदुंबर, काजू, आवळा, शिवण, आंबा अशी सावली देणारी विविध २५ वृक्षारोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार मिलिंद देसाई, राजेंद्र नानचे, श्रीमती राणे, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, किरण मेथे, मंगेश बावदाने, मकरंद माने, श्री. उबाळे, श्री. आघाव यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.