*कोकण Express*
*ठाकरे शिवसेनेतर्फे शैलेश परब यांच्या माध्यमातून बँ. खर्डेकर कॉलेजमधील सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच व स्पर्धा परीक्षा संचाचे मोफत वितरण*
*शैलेश परब यांच्या या उपक्रमाचे प्राचार्य आनंद बांदेकर यांचेकडून कौतुक*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक दृष्टया राज्यात सर्वात आघाडीवर आहे. पण कांहीं गरीब, हुशार विद्यार्थी व विद्यार्थी पुस्तके व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांअभावी सरावांत कमी पडतात. हे जाणून वेंगुर्ले तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी ठाकरे शिवसेना प्रक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या सुचनानुसार खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्लेतील उच्च निकालाची परंपरा राखणाऱ्या बँ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातून सायन्समध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घ्यावे. हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांत उज्वल यश संपादन करण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून पुस्क संच व स्पर्धा परीश्न संच वितरीत करत आहोत. त्याचा उपयोगः सुयोग्य करून आपले व महाविद्यालयाचे नाव रोशन करा. असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी केले.
येथील बँ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात ठाकरे शिवसेनेतर्फे सायन्स विभागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तक संच व स्पर्धा परीक्षा संच वितरणाचा कार्यक्रम ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर उपस्थितांत ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब, शहर महिला आघाडीच्या मंजुषा आरोलकर, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, युवासेना अधिकारी पंकज शिरसाट, प्राचार्य आनंद बांदेकर, प्रा. विणा दिक्षीत, वायंगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुमन कामत यांचा समावेश होता.
यावेळी बँ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील ११ व १२ वी सायन्सच्या २० विद्याथ्र्यांना सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख शैलेश परब तसेच व्यासपिठावरील मान्यवरांचा हस्ते पुस्तक संच व स्पर्धा परीक्षा संच यांचे वितरण करण्यात आले. तर दोन गरीब विद्यार्थीना मोफत गणवेश वाटप युवासेनेचे पदाधिकारी पंकज शिरसाट यांचे हस्ते झाले.
यावेळी शैलेश परब यांनी यावर्षी महाविद्यालयाकडून गरीब विद्यार्थ्यांची यादी मिळाली नव्हती तरी सुध्दा आम्ही ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून सुखात केली आहे. पुढील वर्षी या महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण २०० विद्यार्थ्यांना पुस्तक सेत देणार आहोत. त्यासाठी महाविद्यालयाने गरीब विद्यार्थ्यांची यादी द्यावी असे सूचित केले.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे वासुदेव परब, वैभव फटजी, रफिक शेख, श्रीधर पंडीत प्रा. जे. वाय. नाईक यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब तर सुत्रसंचालन व आभाराचे काम प्रा. विणा दिक्षीत यांनी मानले.