*कोकण Express*
*ऐश्वर्य मांजरेकर व भाग्यश्री मांजरेकर यांचा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेतील यशाबद्दल सत्कार*
*मालवण ः प्रतिनिधी*
मुंबई विद्यापीठामार्फत सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या एम. कॉम परीक्षेत संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ मधुन 73% घेऊन विशेष प्रविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल मातृत्व आधार फाऊंडेशन व मालवण नागरी सहकारी पतसंस्था मार्फत ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुंबई विद्यापीठामार्फत सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या बी.एस. सी परीक्षेत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयं मालवण मधुन 82% मिळवून विशेष प्रविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल भाग्यश्री जनार्दन मांजरेकर यांचा मालवण नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. बहीण भावाच्या या यशाबद्दल त्यांचे समस्त सिंधुदुर्ग वासियांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले .