*कोकण Express*
*मनसे नेते अमित ठाकरे ३० तारखेला सिंधुदुर्गात…..*
*महामार्गाची करणार पाहणी; कार्यकर्त्यांच्या बैठकीत दौऱ्याचे नियोजन…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था लक्षात घेता खास पाहणीसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांची पदयात्रा २३ ते ३० ऑगस्ट अशी कोकणात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील पदाधिकान्यांनी आज बैठक घेऊन नियोजन केले. यावेळी जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेण्यास विरोध दर्शविण्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला.
मनसेनेची बैठक कुडाळ येथील रेस्ट हाऊस येथे मनसे कामगार सेना सरचिटणीस, तथा सिधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे व मनसे राज्य सरचिटणीस संदीप दळवी तसेच माजी संपर्क अध्यक्ष मालवण राजु साटम यांचे प्रमुख उपस्थितीत झाली. ठाकरे कोकणात होणाऱ्या पदयात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या दौन्याविषयी नियोजन करण्यात आले. या दौन्या वेळी कणकवली ब्रिजचे झालेले निकृष्ट काम द कमकुवतपणा, हायवे वारंवार एकाच ठिकाणी होणाऱ्या अपघातग्रस्त जागा, आवश्यक असलेले ब्रिज, सिंधुदुर्ग जिल्हा टोल माफी संदर्भातील तसेच हायवे लगत असलेल्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या माती उत्खनाने उंचवट्यां भागाची माती घसरून दुर्घटना होऊ शकणाऱ्या जागांची पाहणी करून त्याबाबत ठोस व योग्य कारवाई व्हावी त्यावर संबंधित हायवे प्राधिकरणाकडे व केंद्र सरकारकडे मनसेच्या वतीने मागणी करणार आहे. तत्पूर्वी मुंबई- गोवा मार्ग विषयी समस्यांबाबत तसेच वारंवार होत असलेले अपघातग्रस्त जागा, नित्कृष्ट बाधले पूल याबाबतच्या कामांची पूर्तता होईपर्यंत टोल नाके बंदच ठेवावेत याबाबतची चर्चा झाली.