*कोकण Express*
*बादा आरोग्य केंद्रात तात्काळ वैद्यकीय अधिकारी नेमा…..*
*उपसरपंचांसह शहराध्यक्षांची मागणी; आमदार नितेश राणेंची घेतली भेट….*
*बादा ः प्रतिनिधी*
रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकान्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी बांदा उपसरपंच जावेद खतीब, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली. आमदार राणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या संपर्क साधत वैद्यकीय अधिकारी नेमणूकसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात.
वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची भेडशी येथे बदली झाल्यानंतर गेले अडीच महिने हे पद रिक्त आहे. याठिकाणी सर्वाधिक ओपिडी असून टेलिमेडिसिन केंद्र देखील आहे. बांदा हे महामार्गावरील महत्वाचे केंद्र असून याठिकाणी प्रसूती गृह आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे.