*कोकण Express*
*कवी किशोर कदम लिखित ‘युगनायकांची जीवनगाथा’ ग्रंथाचे कष्टकरी महिलांच्या हस्ते प्रकाशन*
*एका अनोख्या प्रकाशन संकल्पनेमुळे श्रमाला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न*
*कणकवली/प्रतिनिधी*
पेक्षाने शिक्षक असलेले कवी आणि संस्कृती कार्यकर्ते किशोर कदम यांच्या प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा” या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मोलमजुरी करणाऱ्या शेतात राबणाऱ्या महिलांच्या हस्ते बावशी येथे प्रकाशन करण्यात आले.या एका अनोख्या प्रकाशन संकल्पनेमुळे श्रमाला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे मत यावेळी कवी कदम यांनी व्यक्त केले.
“वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा” या ग्रंथाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्याची दुसरी आवृत्ती आता प्रसिद्ध करण्यात आली असून त्याचे प्रकाशन कष्टकरी महिला सुवर्णा राणे मनीषा राणे, संगीता कदम, सौ.नार्वेकर, सुनीता कांडर, सुहासिनी कांडर, सौ.मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कवी किशोर कदम, नेहा किशोर कदम, कवी मधुकर मातोंडकर, विनोद ठाकूर, दिनेश पाटील, विलास कांडर, समीर मयेकर, मोहन खडपे, संजय राणे,शिवराम गुरव आदी उपस्थित होते.
पेक्षाने शिक्षक असलेल्या कवी किशोर कदम यांची उपक्रमशील शिक्षक अशी ओळख आहे. सतत विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक दृष्टीने सांस्कृतिक उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांना डोळस दृष्टी दिली. याच पार्श्वभूमीवर श्री कदम यांनी विद्यार्थ्यांची वैचारिक जडणघडण व्हावी आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीलाही अधिक धार प्राप्त व्हावी या उद्देशाने त्यांनी ‘वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा’ या शीर्षकाअंतर्गत निबंधमाला लिहीली आहे.वकृत्व स्पर्धेमध्ये ठराविक विषयांवर वक्तृत्व सादर करून स्पर्धा जिंकल्या जातात. इथे मात्र श्री कदम यांनी ज्या महापुरुषांनी आपला वेगळा इतिहास निर्माण केला तरीही त्यातील काही महापुरुष समाजातून दुर्लक्षित राहिले अशांवर लेखन करून आपली पुरोगामी दृष्टी विस्तारत नेली आहे. अशा लेखनामुळे विद्यार्थ्यांना आपला खरा इतिहास काय आहे हे कळू शकेल आणि त्यातून त्यांची सम्यक दृष्टी घडण्यास या लेखनातून मदत होईल हेच या निबंधमालेचे महत्त्वाचे मोल आहे. असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.