*कोकण Express*
*कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पाठविल्या सैनिकांना राख्या*
आजादी का अमृत महोत्सव समारोह उपक्रमांतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश अभियाना’ चा एक भाग म्हणजेच *मातृभूमी को नमन विरोंको वंदन* यानिमित्ताने सीमेवर भारताचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या पाचशेच्या वर राख्या पाठवून दिल्या आहेत व सोबत त्यांना एक हिंदीतून पत्र ही दिलेले आहे; की ज्यामध्ये देशाप्रती असलेल्या जवानांच्या योगदानाच कौतुक करून त्यांना दीर्घायुष्य चिंतिलेले आहे.
NCC सुभेदार मेजर दिनेश गेडाम,नायब सुभेदार राठोड, हवालदार गुरजीवन सिंग यांच्या हस्ते मराठा इंफ्नट्री बेळगाव व महार रेजिमेंट मध्यप्रदेश येथील हेडक्वार्टर मध्ये पाठविण्यात आलेल्या आहेत.
पत्र… प्रिय सैनिक बंधुनो ,आमचा तुम्हाला सादर प्रणाम!! 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत ‘मातृभूमी को नमन वीरों को वंदन’ या निमित्ताने आमच्या संस्थेच्या विविध अभ्यासक्रमातर्फे बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, बॅ. नाथ पै बी.एड कॉलेज कुडाळ, बॅरिस्टर नाथ पै कॉलेज आॅफ फिजिओथेरपी महाविद्यालय कुडाळ, बॅ नाथ पै नर्सिंग महाविद्यालय कुडाळ, कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय कुडाळ ,बॅ.नाथ पै कला ,वाणिज्य आणि विज्ञान रात्र महाविद्यालय कुडाळ ,बॅ नाथ पै जुनियर कॉलेज कुडाळ, या शाखेतील- अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थ्यांचा आपणास सादर प्रणाम!!
आम्ही आपल्या प्रेमापायी आपणासाठी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या पाठवत आहोत. हे रक्षाबंधन आपणा सर्वांना आनंददायी जावो. सोबत आम्ही आपणास राख्या पाठवत आहोत. आम्हाला माहीत आहे की आपण भारतीय यांची रक्षा प्राणाची बाजी लावून करत आहात.
सैनिक बंधुनो ,भारताच्या प्रत्येक माणसाला- नागरिकाला आपल्यावर गर्व आहे .आम्ही सर्व भारतीय आपले फार कृपाभिलाशी, आभारी आहोत. फक्त आपलेच नाहीत तर आपल्या पूर्ण परिवारा चे सुद्धा आम्ही आभारी आहोत. की ज्यांनी आपल्यामध्ये देशभक्तीची भावना वाढीस लावून आपल्याला आपल्या कुटुंबापासून देशाचे रक्षा करण्यासाठी पाठवलेला आहे .अशा त्यागी परिवारातील सर्व सदस्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो .ऊन पाऊस, पाणी असो ,की वादळ असो; कोणत्याही समस्येवर मात करून आपण देशाची रक्षा करत असतात. एक सैनिक कसे असावेत याचे आपण उत्तम उदाहरण आहात .आपण कधी कोणता धर्म कोणती जातपात न मानता बंधुभाव राखत देशाचं रक्षण निस्वार्थपणे करत असता .आपण ज्या परिस्थितीमध्ये सीमेवर देशाची रक्षा करत असता त्याची आम्ही कल्पनाही करत करू शकत नाही. आपण तिथे आहात म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये निश्चित मनाने झोपू शकतो…
हे पत्र लिहिताना आम्हाला फार आनंद होत आहे. कारण स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगत आहे. आणि आपण आमच्या देशाचे रक्षण करताना जीवाची पर्वा न करता सीमेवर कार्यरत असतात त्यामुळे भारतातल्या प्रत्येक माणसाला आपल्यावर आपला अभिमान आहे.
या पत्राच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा आपले आणि आपल्या परिवारातील सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो आहोत .आभार मानतो.आपल्या बहादुरीला आम्ही शतशः वंदन करत आहोत .
.परमेश्वर आपणा सर्वांना दीर्घायुष्य देवो अशी त्याच्याकडे आम्ही प्रार्थना करत आहोत .आपणा सर्वांना पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने शतशः नमन .
आम्हाला माहित आहे की आम्ही पाठवलेली छोटीशी ही भेट तुम्हाला नक्कीच आवडेल . धन्यवाद!
जय हिंद!!!!
आपले
तुमच्यावर प्रेम करणारे बॅ. नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ, सिंधुदुर्ग चे विद्यार्थी.
संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने, प्रसाद कानडे यांच्या सहकार्याने व सर्व अभ्यासक्रमाच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.