*कोकण Express*
*विद्यामंदीर प्रशालेत आधुनिक अभ्यासक्रमासाठी संगणक वर्गाची निर्मिती.-मुख्याध्यापक पी जे कांबळे*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
शिक्षण प्रक्रियेत आधुनिक दृष्टिकोन ओळखून शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत तसेच इंग्रजी माध्याम प्रशालेत दूरदृष्टीचा विचार करून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय तवटे साहेब यांनी शाळेला संगणकांची देणगी बहाल केली आणि कल्पवृक्षांच्या छायेत विद्यामंदिरचे सर्व विद्यार्थी स्वतः अभ्यासक्रमाची निर्मिती करून संगणक प्रशिक्षण घेत आहेत . शालेय अभ्यासाबरोबरच संगणक अभ्यास खूप अनिवार्य झालेला आहे. आज प्रशालेत एकविस संगणक आहेत. आधुनिक अभ्यासक्रमाची निर्मिती करून तीनशे विद्यार्थी सकाळ संध्याकाळ उत्साहाने शिक्षण घेत आहेत . त्यासाठी संस्थेने प्रशिक्षक नेमून विद्यार्थांची सोय केली आहे . विद्यामंदिर प्रशालेतील संगणक विभाग अद्यावत सोयीनी पूर्ण करण्याचा प्रयत्न शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी सदैव करत आहेत . यासाठी सतत देखरेख असते विद्यामंदिरचे मुख्याध्यापक कांबळे सरांनी नेटके नियोजन करून संगणक विभाग तयार केला आहे. . याकामी पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम प्रशालेच हरहुन्नरी अध्यापक श्री वणवे सर श्री तवटेसर’ श्री बर्डेसर सौ केळुसकर मॅडम नेहमी धडपड करत असतात . मार्गदर्शन करत असतात . संगणक क्लास रूम देखणी करण्यासाठी आणि तंत्रज्ञानयुक्त करण्यासाठी माझे सर्व सहकारी कष्ट घेऊन विद्यार्थी प्रती निष्ठा ठेवून प्रयत्न करत आहेत . प्रशालेचा संगणक विभाग नेहमी सतर्क असतो शाळेतील प्रत्येक विद्यार्थाला संगणक अभ्यासक्रम समजतो का? तसेच त्याचा संगणक सराव महत्चाचा असतो . सरावाने कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते . म्हणून संगणक प्रशिक्षक श्री . निशांत काणेकर सर अष्टपैलू संगणक तज्ञ आहेत . ज्यावेळी संगणक कोर्स आम्ही तयार करत होतो त्यावेळी अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या या सर्व समस्येवर मात करून आज प्रशालेत अद्यावत अभ्यासक्रमाचा संगणक कोर्स तयार झाला आहे. बरेच पालक वर्ग देखिल या कोर्समुळे आनंदित झाले आहेत. शाळा फक्त पाठ्यपुस्तक शिकविणारी नसावी पाठ्य पुस्तकाबरोबरच प्रगत जगाचे ज्ञानभांडार देखिल विद्यार्थासाठी खुले करावे म्हणून आमच्या संस्थेने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वेळापत्रकात हा विषय समावेश केला आहे. थेअरी आणि प्राक्टिकल यांचा संयोग साधून भविष्याचा वेध घेणारा कोर्स तयार करून विद्यार्थी ज्ञानमय करण्याचा हा अल्पसा प्रयत्न .
विद्यामंदिर प्रशाला ही बहूजन वर्गातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची शाळा आहे तसेच ग्रामीण विद्यार्थीची शाळा आहे. म्हणून संगणक कोर्स तयार करतांना बहुजन सर्वसामान्य विद्यार्थांचा विचार करून नाविन्य पूर्ण अभ्यास रचलेला आहे हा अभ्यास अन्यत्र कोठेही पहावयास मिळाणार नाही . आधुनिक तंत्र व मंत्र असलेला हा प्रशिक्षण वर्ग विद्यामंदिर प्रशालेत सुरु आहे या प्रशिक्षण वर्गाला पालक व विद्यार्थांची भरभरून साथ आहे.