*कोकण Express*
*उपजिल्हारुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ..*
*या मोहिमेला जिल्हावासीयांची साथ महत्वाची – आम.नितेश राणे*

*आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुु शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी संजना हळदिवे*
आजचा दिवस भारत देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी भारतनिर्मित कोव्हीड-१९ लसीकरण आज देशभरात सुरू झाले आहे. आत्मनिर्भर भारत हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न भारत देशात बनविलेल्या कोव्हीड-१९ लसीमुळे पूर्ण होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोव्हीड -१९ लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनाने पूर्ण नियोजनबद्ध दक्षता घेतलेली आहे. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रशासनाशी संपर्कात आहोत. जिल्हावासीयांनी यासाठी साथ द्यावी असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते लसीकरण कक्षाची फित कापण्यात आली. आमदार नितेश राणे यांनी लसीकरण शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, पं स सभापती मनोज रावराणे, तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, पं स सदस्य मिलिंद मेस्त्री, डॉ.सतीश टाक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, वॉर्ड इंचार्ज नुपूर पवार, नयना मुसळे, उबाळे, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे,नम्रता गायकवाड, भालचंद्र साळुंखे, केशव पावसकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी मनोहर राजाराम परब यांना लसीकरण अधिकारी निशिगंधा कुबल यांच्या हस्ते प्रथम कोव्हीशिल्ड लस देऊन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी लसीकरण मोहिमेच्या उपजिल्हा रुग्णालयातील इंचार्ज नयना मुसळे यांनी लसीकरण मोहिमेची सविस्तर माहिती दिली. कोव्हीड -१९ लसीचे एकूण दोन डोस प्रत्येकाला दिले जाणार आहेत. आज पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे. लस टोचून घेण्याआधी सॅनिटायज करून स्क्रिनिंग करण्यात येत होते. उपजिल्हा रुग्णालयाच्या एकूण १०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज कोव्हीशिल्ड लस देण्यात येणार आहे. लसीकरणानंतर अर्धा तास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.
