*कोकण Express*
*फोंडाघाटत हिरकणी लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने मधुमक्षिका पालन युनिट प्राथमिक चाचपणी*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी संजना हळदिवे*
फोंडा घाट येथे लुपिन फाउंडेशन व महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग अंतर्गत स्थापित हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र कणकवली च्या वतीने मधु मक्षिका पालन युनिट सुरू करण्या संदर्भात प्राथमिक चाचपणी मार्गदर्शन मीटिंग घेण्यात आली.
यावेळी लुपिन फाउंडेशनचे श्री.म्हापणकर सर, माविन DCO मां. काळे साहेब, खादी ग्रामोद्योग चे डॉ. सुरज सर, श्री. पाटील सर, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री चौलकर सर, हिरकणी व्यवस्थापिका सीमा गावडे, सहयोगीनी श्रद्धा चोरगे, कृषी अधिकारी परब मॅडम व शेतकरी वर्ग उपस्थित होते.