*कोकण Express*
*राजन तेली यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन विविध विकास कामाबद्दल केली चर्चा…..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची आज सिंधुदुर्ग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्गातील उद्योगा संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच सिंधुदुर्गात रखडलेल्या विकास कामांचे प्रश्नांकडे देखील तेली यांनी यावेळी मंत्री राणे यांचे लक्ष वेधले.
श्री तेली हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून ते भाजपच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेत आहेत. सिंधुदुर्गाच्या विविध प्रश्नांवर ते मत्र्यांचे लक्ष वेधत आहेत.