*कोकण Express*
*सावंतवाडी तालुक्यातील अकराही ग्रामपंचायतवर भाजपचाच झेंडा फडकेल; नगराध्यक्ष संजू परब यांचा दावा*
सावंतवाडी तालुक्यातील अकराही ग्रामपंचायतीमध्ये प्रचारासाठी आपण पोहोचलो आहे मात्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी इन्सूली, तळवडे व मळेवाड या ग्रामपंचायतीची जबाबदारी आपल्याकडे दिली होती. या सर्व ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकणारच असा दावा भाजपाचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला.सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगर परिषद सभापती सुधीर आरीवडेकर उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील अन्य गावांतही आपण कार्यकर्त्यांच्या गाटीभेटी घेत प्रचारातही सहभाग घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निवडणूकीत भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्व काम केले आहे त्यामुळे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला.