*कोकण Express*
*फोंडाघाट उगवाई नदीवर ब्रिज जवळचा वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी संजना हळदिवे*
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट गावात आज शुक्रवार दिनांक 15 /1/ 2021 रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत जवळील उगवाई नदीवर ब्रिज जवळचा वनराई बंधारा घालण्याचा शुभारंभ कणकवली पंचायत समिती सभापती माननीय श्री. मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी फोंडा ग्रामपंचायत सरपंच संतोष आग्रे, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी चंद्रकांत चौलकर, उपसरपंच सुदेश लाड, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ जाधव ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.