*कोकण Express*
*राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त फुलविक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच प्रभारी राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील रामेश्वर मंदिर, सातेरी मंदिर, हनुमान मंदिर, कॅम्प स्वामी समर्थ येथील फुलविक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन गोरगरीब जनतेचे नुकसान झाले असल्याने माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा वाढदिवसा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता विविध सेवा उपक्रम आयोजित करुन ‘सेवादिन‘ साजरा करण्यात येत आहे.
वेंगुर्ला भाजपाजर्फे आज रामेश्वर मंदिर येथील फुलविक्रेत्यांना केलेल्या छत्र्या वाटपावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे पपू परब, जिल्हा सदस्य साईप्रसाद नाईक, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस यांच्यासह प्रकाश रेगे, पुंडलिक हळदणकर, शरद मेस्त्री, राजेश कांबळी, संतोष सावंत, प्रणव वायंगणकर, प्रितम सावंत, रवी शिरसाठ, शेखर काणेकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, रामेश्वर देवस्थानचे रविद्र परब, दाजी परब उपस्थित होते.