तुकारामांच्या ओव्यांचा दाखला देत आमदार वैभव नाईक यांच्यावर खोचक शब्दात टीका

तुकारामांच्या ओव्यांचा दाखला देत आमदार वैभव नाईक यांच्यावर खोचक शब्दात टीका

*कोकण Express*

*तुकारामांच्या ओव्यां म्हणून दाखवत आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका!*

*श्री सदस्यांची भावना दुखावल्याने आमदार वैभव नाईक यांना कर्माची फळे भोगावे लागणार*

*आमदार नितेश राणेंवरील टीकेला भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांचे प्रत्युत्तर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे “उपजुनी करंट नेने, अद्वैत वाटा” प्रमाणे नको त्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. आमदार वैभव नाईक यांनी श्री सदस्यांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्याच अंगलट आलेले आहेत. श्री संप्रदायाच्या विरोधात गेल्याची फळे आमदार वैभव नाईक यांना भोगावे लागतील. असा पलटवार भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी केला. कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत श्री. कानडे बोलत होते.

यावेळी उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, वागदे सरपंच संदीप सावंत, संतोष चव्हाण उपस्थित होते.

संत तुकाराम यांच्या जातो न येतीया वाटा..काय निरवतो करंटा.. कैसा जालासे बेशरम… लाज नाही न म्हणे राम यांच्या ओवीचा दाखला देत संतोष कानडे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका केली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या श्री संप्रदायाबद्दल वैभव नाईक यांनी काढलेले उदगार चुकीचे आहेत. नानासाहेब धर्माधिकारी आणि श्री सदस्यांबद्दल आमदार नितेश राणे संभ्रमावस्था निर्माण करत असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर कानडे यांनी पत्रकार परिषदेत दिले. सहा महिन्यांमागिल अधिवेशनात काँग्रेसने काढलेल्या मुद्दाला तात्काळ वैभव नाईक अथवा उबाठा सेनेच्या आमदारांनी हरकत का घेतली नाही ? त्यांच्या मुद्दयाला खतपाणी घालण्याचे कामच उबाठा सेनेने केले आणि आता सहा महिन्यांनी मागील मुद्दा उकरून पुन्हा श्री सदस्यांच्या भावना आमदार वैभव नाईक दुखावत आहेत. याची फळे त्यांना भोगावी लागतील अशी टीकाही कानडे यांनी केली. तसेच काँग्रेस सोबत महाविकास आघाडीत असणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदार नाईक यांना त्यावेळी बोलायला तोंड धरले होते का असा सवाल देखील श्री. कानडे यांनी केला. श्री सदस्य संप्रदायबद्दल तुम्ही बदनामी करत असाल तर जशास तसे उत्तर दिला जाईल. असा इशारा देखील त्यांनी दिला.

*कुडाळ – मालवणचे पुढील आमदार निलेश राणेच!*

कुडाळ – मालवण विधानसभेचे पुढील आमदार निलेश राणेच असणार आहेत. राजकारण आणि अध्यात्म यात फरक आहे. हे वैभव नाईक यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देखील श्री. कानडे यांनी दिला आहे. आ. नाईक यांचे आता अवघे १० महिने राहिले आहेत, आपल्या आमदारकीचे कालावधीत जनतेची दिशाभूल थाबवावी, असा टोला संतोष कानडे यांनी लगावला. तसेच भविष्यात निलेश राणे हे आपला निश्चित पराभव करणार आहेत. जे श्री सदस्या बद्दल बोलला आहेत, त्याची किंमत तुम्हाला मोजायला लागेल. आता पासून भोग भोगायला लागेल. संप्रदाय लोकांना बोलून डीवचू नका. आ. नितेश राणेंनी जे सभागृहात मांडला तेच सांगितले. जर ते बोलला नसला तर खुलासा करा,अशी मागणी संतोष कानडे यांनी केली आहे. उगाच श्री सदस्या बद्दल आ. नितेश राणे यांच्या बद्दल संभ्रम पसरवू नका, असा सल्ला संतोष कानडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!