*कोकण Express*
*दापोली येथुन दर्शनाकरीता जाणाऱ्या बसेसना उत्पन्न मिळत नसल्याचे दाखवून बंद- राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले*
*दापोली:-दापोली आगाराकडुन चालवण्यात येणारी ०५.३० दापोली परळी वैद्यनाथ,०७.०० दापोली नगर शिर्डी,०९.०० दापोली सोलापूर अक्कलकोट,दापोली मिरज विजापूर या बससेवा उत्पन्न कमी येत असेल बससेवा चालत नसतील तर सोलापूर,बीड,मिरज,अ.नगर विभागाकडून चालवण्याची मागणी प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले यांनी पत्रात मागणी केली आहे*
दापोली शिर्डी,दापोली अक्कलकोट,दापोली अंबाजोगाई परळी वैजनाथ या बससेवा सुरु करण्यात याव्यात अशी मागणी वारंवार करण्यात आहे मात्र मा.श्री.प्रज्ञेष बोरसे विभाग नियंत्रक रत्नागिरी व विभागीय वाहतूक नियंत्रक श्री.सचिन सुर्वे मागणीकरांना खोट आमच्याशी कसे हे दाखवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे तरी ०५.३० दापोली परळी,०९.०० दापोली अक्कलकोट,१६.३० दापोली विजापूर या बस उत्पन्न नसल्याचे दाखवून बंद ठेवण्यात आलेल्या आहेत ०७.०० दापोली शिर्डी ही बस विभागीय नियंत्रक प्रज्ञेष बोरसे व विभागीय वाहतूक नियंत्रक सचिन सुर्वे यांनी वैभव बहुतूले यांना दिलेल्या पत्रात दापोली शिर्डी बस चालनात आहे त्यामुळे चालु करण्याची आवश्यकता नाही अभ्यास न करता दिलेली उत्तरं पण मा.श्री.प्रज्ञेष बोरसे विभागीय नियंत्रक रत्नागिरी व सचिन सुर्वे विभागीय वाहतूक नियंत्रक रत्नागिरी यांना माहित नसेल की दापोली नगर शिर्डी बससेवा ही सेमी केल्यापासून दापोली ते पुणे पर्यंत चालवली जात आहे दापोली शिर्डी साध्या बसला जे उत्पन्न येत होते ते देखील दापोली ते पुणे पर्यंत चालवुन येत नाही शिर्डी येथे जाणाऱ्या साई भाविक व प्रवासी वर्गात नाराजीचा सूर दिसुन येत आहे या बसेस उत्पन्न चांगले येत असुन देखील उत्पन्न कमी येते त्यामुळे या बंद करण्यात आल्याचे वारंवार मा.श्री.प्रज्ञेष बोरसे विभागीय नियंत्रक रत्नागिरी व सचिन सुर्वे विभागीय वाहतूक नियंत्रक रत्नागिरी किती हंगामात कोरोनानंतर किती हंगामात चालवली याची लवकरात माहिती पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे