*कोकण Express*
*महेश संसारे यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड..*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर शेतकरी प्रतिनिधी म्हणून श्री महेश संसारे यांची निवड करण्यात आली आहे ग्राहकाची होणारी फसवणूक आणि त्याबाबत ग्राहकांना त्यांच्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार मिळालेले अधिकार याबाबत जिल्हास्तरावर काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली असून जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना आपल्या अनुभवाचा फायदा यापुढे तेसंरक्षण परिषदेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करतील
महेश संसारे हे वैभवावाडी येथील मांगवली गावचे रहिवासी असून विविध पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी आहेत त्याच बरोबर त्यांच सामाजिक कार्य ही खूप मोठं आहे ते वैभववाडी तालुक्यातील प्रवण फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. चे अध्यक्ष, माजी चेअरमन तालुका खरेदी-विक्री सह. संघ, जिल्हा अध्यक्ष पंचगव्य डॉ असो. महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष- सिंधुदुर्ग जिल्हा देशी गोपालक / गोउत्पादक संघ सिंधुदुर्ग, उपाध्यक्ष कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई, सदस्य – शेतकरी सल्ला समिती (आत्मा) तालुका, जिल्हा स्तरीय, सदस्य – रोटरी क्लब ऑफ वैभववाडी, माजी सरपंच/ अध्यक्ष तंटामुक्त समिती ग्रा.प. मांगवली अशा विविध पदावर काम करत मोठा अनुभव प्राप्त व्यक्तिमत्व आहे
त्यांच्या निवडीबद्दल अनेक मित्र परिवार आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.