*कोकण Express*
*शिडवणे नं. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण*
*कासार्डे : संजय भोसले*
शिडवणे नं.१ शाळेत विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून शाळेतील मुलांसाठी शैक्षणिक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
वैयक्तिक स्वरुपात देणगीदार वस्तुरुपाने देणग्या देऊन शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हातभार लावीत असतात.यावर्षीही शाळेत तिसऱ्यांदा मोठ्या स्वरुपात मोफत शैक्षणिक वस्तूंचे समारंभपूर्वक वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीदेवी सरस्वती माता आणि श्रीगणेश यांना पुष्पहार अर्पण करून तसेच दिपप्रज्ज्वनाने झाली. गावठणवाडी उत्कर्ष मंडळ शिडवणे यांजकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कै.नारंगीबेन जयंतीलाल जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नीता वसंत जैन , वसंत जयंतीलाल जैन यांच्या सौजन्याने शिडवणे नं. १ व शिडवणे कोनेवाडी शाळेतील सर्व मुलांमुलींना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. तसेच मयूर रसिकलाल शेठ आणि उज्ज्वला मयूर शेठ यांच्या सौजन्याने ५ वी ते ७ वीच्या सर्व मुलांना कंपासपेट्यांचे वितरण करण्यात आले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या सौजन्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व मुलांना २८६ वह्यांचे वितरण केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या सौजन्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व मुलांना लॉंगबुक वह्यांचे वाटप केले. तसेच राष्ट्रपती पोलीसपदक पुरस्काराने सन्मानित सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय टक्के यांच्या सौजन्याने पहिली ते चौथीच्या एकूण ३० मुलांना पाट्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , ज्येष्ठ शिक्षणप्रेमी बंडू कोकाटे , सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के , मुंबई पोस्ट अधिकारी विलास चौकेकर , शालेय स्वराज्य मंडळाचे मुख्यमंत्री अथर्व कुडतरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , शिडवणे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , सेवानिवृत्त राष्ट्रपती पोलीसपदक पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय टक्के , बंडू कोकाटे , विलास चौकेकर , वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर , मंगेश शेट्ये , सुनिल शेट्ये , ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के , सुप्रिया पांचाळ , शांताराम धुमाळ , शिडवणे तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र टक्के , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार , शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे , पोलीसपाटील समीर कुडतरकर , सचिन टक्के , प्रेरणा कासार्डेकर , माजी अध्यक्ष रजनीकांत चव्हाण , मेघना सुतार , सचिन सुतार , प्रवीण पाटणकर , तारीफ शेख , श्रीराम पाष्टे , गणेश पाष्टे , आन्वी येतकर , स्नेहा पांचाळ , चंद्रकांत पाटणकर , गणेश पाष्टे , अनिल गुंडये , महेश पाष्टे , सत्यवती वारिसे , मानसी रांबाडे , सायली सुतार , अंकिता जाधव , कोमल वारिसे , रेश्मी भोवड , रुपाली पाष्टे , पाटणकरबाई , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर आणि शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. सदर कार्यक्रम उत्तम संपन्न झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ , माता पालक संघ यांनी सर्व देणगीदार संस्थांचे विशेष आभार मानून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गावठणवाडी उत्कर्ष मंडळ शिडवणेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटये , वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर , मंगेश शेट्ये आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचेही आभार मानले.