माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे २२ जुलै रोजी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२० जिल्हास्तरीय मोफत मार्गदर्शन कार्यशाळा

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे २२ जुलै रोजी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२० जिल्हास्तरीय मोफत मार्गदर्शन कार्यशाळा

*कोकण Express*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे २२ जुलै रोजी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२० जिल्हास्तरीय मोफत मार्गदर्शन कार्यशाळा*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स‌‌‌ कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेत शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४.०० या वेळेत नवीन शैक्षणिक धोरण (NEP) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे*.
**या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते सन्मा. प्रा. श्री. पी. आर्.नाडकर्णी (चेअरमन, गोवा बोर्ड ऑफ एज्युकेशन सेकंडरी ॲण्ड हायर सेकंडरी, गोवा राज्य) लाभले आहेत. कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष पद सन्मा. श्री सतीशजी सावंत (अध्यक्ष, क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबई) भूषविणार आहेत. मा.श्री. मोहन वासुदेव सावंत ( माजी विस्तार अधिकारी,शिक्षण विभाग सिंधुदुर्ग) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे*.
*सदर नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीला राज्यात सुरुवात झाली आहे. त्या विषयीचे तीन शासन निर्णय जारी झाले तरीही या धोरणाबाबत हवी तेवढी चर्चा, जनजागृती,विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालकांसह समाजात झालेली नाही*.*त्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे*.
*शिक्षणात काळानुरूप बदल झाले पाहिजेत, तरच स्पर्धेच्या युगात आजचा युवक टिकाऊ धरू शकतो.त्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गरजेचे आहे*.
*या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक,मुख्याध्यापक तसेच शिक्षक प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी यांच्याकडून करण्यात आले आहे*.
*अधिक माहितीसाठी प्रशाला* *पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण* (९४२११४४६०५) *तसेच सहाय्यक* *शिक्षिका सौ. मृणाल साटम* (९४०३३६७५७३ ) *यांच्याशी संपर्क साधावा*
*टिप – सहभागी सर्व प्रशिक्षणार्थींची दुपारच्या जेवणाची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आली आहे*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!