*कोकण Express*
*सिंधुदुर्गातील इतर मागास प्रवर्गातील ‘वाणी’ समाजातील ‘वैश्य’ असे नोंद असलेल्या पुराव्यांना इतर मागास वर्गात दाखले मिळावेत..*
*सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना शिवसेना संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांचे निवेदन..*
*सिंधुदुर्ग,दि.१४:*
जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील ‘वाणी’ समाजातील ‘वैश्य’ असे नोंद असलेले पुरावे यांना इतर मागास वर्गात दाखले मिळावे याबाबतच्या मागणीचे निवेदन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना शिवसेना संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी दिले.
श्री. पार्सेकर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाणी समाजातील लोकांना ‘वाणी’ या नोंद असलेल्या पुराव्या प्रमाणे इतर मागास वर्ग दाखले शासन निर्णय क्र. सीबीसी /१०/२००८ प्र. क्रमांक २३५/ मावक – ५ चा २१ जून २००८ निर्णय प्रमाणे इतर मागास प्रवर्गात दाखले देण्यात येतात. तसेच वाणी समाजातील ज्या दाखल्यावर वैश्यवाणी, वैश्य वाणी, वै वाणी,V वाणी, पानारी असे नोंद असलेल्या समाजबांधवांना शासन निर्णय क्रमांक सीआयआरसी- १०/ २००४/ सीसीआर ९/ मावक चा निर्णय १ मार्च २०१४ रोजी पासून इतर मागासवर्गीय (१९०) म्हणून दाखला देणार येतात, परंतु वाणी समाजातील काही लोकांच्या दाखल्यावर फक्त ‘वैश्य’ असा उल्लेख आहे ते वाणी समाजातील बांधव आहेत पण अशा लोकांना शासनाकडून वैश्य नोंद असलेल्यांना इतर मागासवर्गीय म्हणून दाखला देण्यात येत नाही. तरीपण या विषयात लक्ष देऊन वैश्य अशी नोंद असलेल्या समाजातील बांधवांना (१९०)प्रमाणे इतर मागासवर्गीय म्हणून दाखले देण्यात यावेत व समाज बांधव आरक्षणापासून शाळा, कॉलेज, नोकरीला वंचित होण्यापासून आपल्या समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील वाणी समाजातील ‘वैश्य’ असे नोंद असलेले पुरावे इतर मागास वर्गात दाखले मिळणे बाबत शिवसेना कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.