*कोकण Express*
*कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न*
*कासार्डे : संजय भोसले*
कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेमध्ये नुकताच योजनांचा जागर हा विविध योजनांच्या माहिती देणारा कार्यक्रम शाळेमध्ये राबविण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी कळसुली शिक्षण संघाचे स्कूल कमिटी सचिव के. आर. दळवी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे नामदेव घाडीगावकर – स्कूल कमिटी व्हाईस चेअरमन, अंकुश परब- कळसुली शिक्षण संघ मुंबई कार्यकारिणी सदस्य मुख्याध्यापक व्ही.व्ही.वगरे ,ज्येष्ठ शिक्षक एस. के. सावळ , शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष शिवाजी साबाजी गुरव, इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षक पालक संघाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. इयत्ता पाचवी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या कळसुली दशक्रोशीतून पालक संघ निवडण्यात आला.
प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक व्ही.व्ही.वगरे यांनी शिक्षक-पालक संघाची उद्दिष्टे व महत्व विशद केले. त्याचप्रमाणे शिक्षक पालक संघाचे कार्य आणि शालेय उपक्रमामध्ये सहभाग याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रशालेमध्ये योजनांचा जागर या कार्यक्रमांतर्गत शाळेत विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना जसे इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, अल्पसंख्यांक मुलीसाठी हजरत बेगम महल शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, धार्मिक अल्पसंख्यांक मुला-मुलींसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस यासारख्या विविध शिष्यवृत्ती योजना प्रशालेमध्ये असून त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी या योजनांची सविस्तर माहिती यावेळी समस्त पालक वर्गांना देण्यात आली. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व शिष्यवृत्तीची रक्कम याबाबत पालकांना अवगत करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये शिक्षक पालक संघ आणि शाला व्यवस्थापन समिती सदस्यांची कार्यकारणी निवडण्यात आली.
शिक्षक पालक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक व्ही.व्ही.वगरे तर उपाध्यक्ष जयवंत सुरबा घाडीगावकर तर सचिव म्हणून शिक्षकांमधून बी.आर. पालव यांची उपसचिव सौ प्रियांका पंढरी देसाई तर सदस्य धाकू लवू घाडीगावकर, रणजीत रघुनाथ सुतार, दीपक रामचंद्र राणे, श्रीम. शारदा अनंत सावंत, प्रभाकर जगन्नाथ दळवी, सुभाष भास्कर नाईक, सौ.सुकन्या सुमंगल कदम यांची नवीन कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी साबाजी गुरव तर उपाध्यक्ष पांडुरंग यशवंत सावंत, सचिव – प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.व्ही.वगरे,शिक्षकांमधून सदस्य एस.के.सावळ,शिक्षण तज्ञ म्हणून नीलकंठ महादेव मुंडले, स्थानिक प्राधिकरण अधिकारी रविकांत हनुमंत दळवी त्याचप्रमाणे शिवप्रसाद आत्माराम घाडीगावकर, शंकर अनंत गावकर, सिताराम शिवराम मेस्त्री, श्री. गणेश राजाराम पाडावे, राजेश विजय भोगले, सौ.श्वेता श्रीकृष्ण दळवी, सौ.स्मिता विनायक भोसले आदींची नेमणूक करण्यात आली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना स्कूल कमिटी चेअरमन श्री के.आर.दळवी यांनी सर्व पालक वर्गाला प्रशालेच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.तसेच नवीन कार्यकारणीला शुभेच्छा देत मागील कार्यकारिणीचे चांगल्या कार्यासाठी आणि सहकार्यासाठी आभार व्यक्त केले.
या सभेचे सूत्रसंचालन आणि आभार एस. ए.परुळेकर यांनी मानले.