*कोकण Express*
*रिव्हॉल्व्हर, हत्यारांसह वागदेतून एक संशयित पोलिसांच्या ताब्यात*
*सोन्याचे दागिने, बंदुक, अन्य हत्यारा सह महत्वाच्या वस्तू हाती*
*पर राज्यातील संशयताचे गेले काही दिवस कणकवली तालुक्यात वास्तव्य?*
*पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार*
गेले काही दिवस कणकवली तालुक्यात वास्तव्यास असलेल्या परराज्यातील एका व्यक्तीकडे रिव्हॉल्व्हर, बंदुकीसह सोन्याचे दागिने व पैसे मोजण्याची मशीन व काही हत्यारे असा मुद्देमाल सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत पोलीस अधीक्षक आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या विषयी त्या संशयितांला काल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पोलिसांकडून अधिक माहिती देण्यास नकार देण्यात आला. दरम्यान उपलब्ध माहिती नुसार या संशयताच्या गाडीत हत्यारांसह तो वागदे येथे राहत असलेल्या घरामध्ये काही महत्त्वाचा मुद्देमाल सापडल्याची खात्रीशीर माहिती आहे. पोलिसांनी तो राहत असलेल्या घराची झाडाझडती घेतल्याचे ही समजते. मात्र याबाबतची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. सशयीताच्या अटकेमुळे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.