आम्ही कणकवली रुग्णालयात गेल्यावर आमदारांना जाग आली • सुशांत नाईक

आम्ही कणकवली रुग्णालयात गेल्यावर आमदारांना जाग आली • सुशांत नाईक

*कोकण Express*

*आम्ही कणकवली रुग्णालयात गेल्यावर आमदारांना जाग आली • सुशांत नाईक …..*

*युवासेना कणकवली विधानसभा मतदारसंघातील सरकारी रुग्णालयांमध्ये धडक देणार; आमदार नितेश राणेंच्या अनेक फसव्या घोषणा….*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गेलो होतो, त्यावेळी रुग्णालयात अनेक समस्या आहेत. त्याचे कथन डॉ. धर्माधिकारी यांनी केले होते. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक यंत्रसामुग्री, त्याचबरोबर डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची गरज आहे. मात्र केंद्र आणि राज्यात नितेश राणे सत्तेत असताना देखील या रुग्णालयात यंत्रसामग्री आणि डॉक्टराची रिक्त पदे शासन केव्हा भरणार? हा खरा प्रश्न आहे. तात्पुरती खाजगी पद्धतीने १२ कर्मचारी देऊन नितेश राणेंनी जनतेची फसवणूक थांबवावी, असा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. तसेच पुढील काळात युवा सेना सरकारला जाग आणण्यासाठी कणकवली विधानसभेतील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये धडक देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी विधानसभा संघटक राजू राठोड, युवासेना तालुकाध्यक्ष सचिन

आचरेकर, तालुका संघटक नितेश भोगले, विभागप्रमुख सिद्धेश राणे आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते..

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती, तापाचे ऑर्थोपेडिक्स, साथ रोगांचे रुग्ण तपासणी साठी येतात. मात्र, त्या रुग्णांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया करणेसाठी आयसीयू कमी आहेत. लहान मुलांच्या तपासणी नंतर उपचारासाठी यंत्र सामुग्री आवश्यक असल्याचे डॉ. धर्माधिकारी सांगताहेत, त्यानुसार

आ. नितेश राणे यांनी आवश्यक मागणी प्रमाणे पूर्तता केली पाहिजे, असा टोला सुशांत नाईक यांनी लगावला.

आम्हाला बोलताना आता दिलेल्या कर्मचाऱ्या बाबत काहीही सांगितले नव्हते. आ. नितेश राणे खासगी संस्थेमार्फत १२ कर्मचारी का देणार? राज्यात शासन तुमचे आहे. गेली ९ वर्षे काय करत होतात? आपल्या मतदार संघातील तुम्हाला आज समस्या समजल्या का? जनतेचा प्रश्नावर आज जाग आली का? आता असलेले डॉ. धर्माधिकारी याना तुमची शस्त्रक्रिया आम्हाला करायला लावू नका, अशी धमकी दिली. त्यामुळे या रुग्णालयात डॉक्टर येत नसल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला.

आ. नितेश राणेंनी सुरु केलेला वायफाय कणकवलीची जनता शोधतेय, औषध आपल्या दारी, स्कुबा डायव्हिंग आमदारांनी हे प्रकल्प आणलेत ते कुठे आहेत? आता रुग्णालयात खासगी कर्मचारी आणलात ते किती दिवस असणार आहेत? उपचार करताना या लोकांकडून चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमदार तुम्ही घेणार का? असा सवाल सुशांत नाईक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!