विद्यार्थी व नागरिकांचे दाखले प्रलंबित राहिल्यास तहसीलदारांवर कडक कारवाई करा : पालकमंत्री रवींद्र चव्हाण

विद्यार्थी व नागरिकांचे दाखले प्रलंबित राहिल्यास तहसीलदारांवर कडक कारवाई करा : पालकमंत्री रवींद्र चव्हाण

*कोकण Express*

*विद्यार्थी व नागरिकांचे दाखले प्रलंबित राहिल्यास तहसीलदारांवर कडक कारवाई करा : पालकमंत्री रवींद्र चव्हाण*

*सिंधुनगरी*

मी महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाही डोबिवलीतच राहतो याची जाणीव जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यानी अधिकान्यांना करून देत विद्यार्थ्याचे दाखले सर्वरचे खोटे कारण सांगून महसूल अधिकारी पेंडिंग ठेवत आहेत. सर्व डाऊन असेल तर आमदार खासदारांनी फोन केला की लगेच दाखला का बाहेर पडतो? दाखले प्रलंबित ठेवण्याचे कारण मला माहित आहे! मात्र यापुढे असा प्रकार झाल्यास संबंधित अधिकान्यांवर कारवाईकरा अशा कडक सूचना के मंजूलक्ष्मी यांना जिल्हा नियोजन समिती सभेत दिल्या. तिन्ही उपविभागीय अधिकारी सभागृहात उपस्थित असतानाही प्रलंबित दाखल्याची संख्या सांगण्यास पुढे आले नाहीत ती प्रलंबित दाखल्याची संख्या ही पालकमंत्र्यांनी

अखेर जाहीर केली.

तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हा रुग्णालय व जात पडताळणी विभाग या सर्वच विभागाची व प्रलंबित राहिलेल्या दाखल्याची झाडाझडती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली. प्रामुख्याने इकॉनोमी बॅकवर्ड क्लास म्हणजे इ डब्ल्यू एस प्रमाणपत्र अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक रखडून ठेवले आहे याकडेही त्यांनी गांभीर्याने लक्ष वेधले. महसूल विभाग नागरिक आणि विद्यार्थ्यांचे दाखले जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवतो, आमदार खासदारांनी फोन केला सदर दाखला तत्परतेने होतो. मात्र अन्य सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांचे दाखले सर्व्हरचे कारण पुढे करून प्रलंबित ठेवले जातात, हे दाखले प्रलंबित ठेवण्याचे कारणही मला माहित आहे! यापुढे असा प्रकार घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, प्रलंबित दाखले का राहिले याचा अहवाल तयार करून सादर करा असे आदेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या बैठकीत दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास व त्याचा आराखडा तोही जिल्ह्यातील स्थानिक कन्सल्टंट ची मदत घेऊन तयार करावा, पर्यटन जिल्हा असून त्यासाठी अधिकचा निधी मिळावा म्हणून ठोस निर्णय घेण्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न व याबाबत नागरिकांच्या तक्रारी याची दखल त्यांनी घेत पाऊस सुरू झाल्यापासून खंडित

वीज पुरवठ्यामुळे किती गावे किती वेळ अधारात राहिली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश वीज अधिकान्यांना त्यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तज्ञ डॉक्टर्स व वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था चांगली असावी तरच हे अधिकारी या जिल्ह्यात टिकतील

व चांगली सेवा देतील म्हणून अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील हे जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी असून त्यांनी आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या निवासाच्या प्रश्नाबद्दल गांभीर्याने लक्ष घालावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात कणकवली व सावंतवाडी व अन्य भागातील उपजिल्हा रुग्णालयात मशनरी आहे पण तज्ञ डॉक्टर नाहीत व तज्ञ डॉक्टर आहेत तिथे मशनरी नाही याबाबतही आढावा घ्यावा जे आवश्यक आहे त्याबाबत आराखडा तयार करून आपल्याला सांगावे या जिल्ह्याची चांगले रुग्णसेवा व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी रोटरी लायन्स क्लब किंवा अन्य स्वयंसेवी संस्थांची मदत घेता येईल व आरोग्य सेवेत सुधारणा करता येईल अशाही सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!