*कोकण Express*
*पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांची चौकशी करा*
*पालकमंत्री रविंद्र चव्हाण*
**सिंधुदुर्गनगरी*
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या कामाबाबत मोनोपॉली करुन सिंधुदुर्ग सारख्या पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांची व अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.*
पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांनी आढावा दिला. यानंतर पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, चार-चार वेळेला निविदा काढूनही जर कोणी ठेकेदार निविदेसाठी येत नसेल तर, या जिल्ह्याला वेठीस धरणारा प्रकार आहे. ठेकेदारांची मोनोपॉली दिसून येते. अशा ठेकेदारांची आणि त्यांना मदत करणारे अधिकारी यांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी.
ठेकेदार आणि बेजबाबदार अधिकारी यांच्यामुळे सामान्य जनतेची गैरसोय होत आहे. शासनाच्या माध्यमातून विविध रस्ते योजांनासाठी निधी मंजूर होत आहे परंतु ठेकेदारांचा आडमुठेपणा व काही अधिकारींचा बेजबदारपणा यामुळे जनतेचे हाल होत आहे पण यापुढे हे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशारही मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिला.