ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या मुख्याध्यापिका सौ . अर्चना शेखर देसाई याना उत्कृष्ठ कामगिरीबद्दल  “जिल्हास्तरीय SOF Foundation चा डिस्ट्रिक्ट बेस्ट प्रिन्सिपॉल पुरस्कार “

ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या मुख्याध्यापिका सौ . अर्चना शेखर देसाई याना उत्कृष्ठ कामगिरीबद्दल  “जिल्हास्तरीय SOF Foundation चा डिस्ट्रिक्ट बेस्ट प्रिन्सिपॉल पुरस्कार “

*कोकण Express*

*ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या मुख्याध्यापिका सौ . अर्चना शेखर देसाई याना उत्कृष्ठ कामगिरीबद्दल  “जिल्हास्तरीय SOF Foundation चा डिस्ट्रिक्ट बेस्ट प्रिन्सिपॉल पुरस्कार “*

राष्ट्रीय स्तरावर(SOF) सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशन कार्य करते सायन्स / maths/ बुद्धिमत्ता या विषयात विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी या हेतूने दर्जेदार गुणवत्तापूर्वक परीक्षा घेतल्या जातात त्यामधून गुणवत्तेच्या आधारे क्रमांक ठरवुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते
गतवर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेच्या कु.दिया जयराम प्रभुदेसाई हिने राज्यात ४ था क्रमांक तर आर्यन ऋषिकेश यादव याने राज्यात ७ वा क्रमांक पटकावला . याशिवाय २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सुवर्ण/ रौप्य/ कांस्य पदके प्राप्त केली
या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन ,नियोजन शैक्षणिक व प्रशासकीय कामगिरी विध्यार्थी व शाळेच्या प्रगतीसाठी दिला जाणारा हा जिल्हास्तरीय या वर्षीच्या पुरस्कार आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई याना देण्यात आला.या पुरस्कार अंतर्गत सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आले या निमित्ताने व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत ,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल ,सचिव प्राध्यापक श्री. हरिभाऊ भिसे,सल्लागार डी. पी .तानावडे सर ,हे उपस्थित होते .सर्वांनी आपल्या मनोगतातून देसाई मॅडमना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.हेमंत पाटकर यांनी केले तर सर्वांचे आभार श्री.तानावडे सर यांनी मानले.
सौ.अर्चना देसाई मॅडम याना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, सहसचिव श्री.निलेश महिंद्रकर आणि खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!